द्वैत-अद्वैत
कणी माना अथवा मानू नका. प्रत्येक मनाला हवं असतं एक मनासारखं मन.
मनांच्या मीलनातून साकारतं प्रेम. द्वैताकडून अद्वैताकडे नेणारं.
द्वैत-अद्वैत, प्रेमाची अतुलनीय परिणती.
द्वैत-अद्वैत, जिथे स्वत्व विसिर्जित होतं. दोन भिन्न अस्तित्व एकरुप होतात. अस्तित्वांच्या सार्थकतेसाठी केलेला अस्तित्वाचा त्याग.
द्वैत-अद्वैत, जिथे सर्व मुखवटे गळून पडतात. उरतं ते फक्त नैसर्गिक सत्य. लौकिकतेचा स्पर्शही नसलेला एक अलौकिक आनंद.
द्वैत-अद्वैत, जिथे एकमेकांत विरघळून जाण्याने, सावलीसारखे एकजीव होण्याने मिळणारा आनंद अवर्णनीय ठरतो.
द्वैत-अद्वैत, जिथे घेण्यापेक्षा देण्यामुळे खरं समाधान मिळतं. लुटण्यापेक्षा अर्पण करण्यात सार्थकता वाटते.
द्वैत-अद्वैत, निसर्गाने बहाल केलेला अत्युच्च आनंद.
द्वैत-अद्वैत, एक शब्दातीत अनुभूती.
‘DvaitAdvait’
Incredible but true, every mind seeks another soul mate
Since, from this union evolves love
And from love evolves ‘Dvait-Advait’ – the unfathomable
abstract state of love
Where the self immerses itself into another
and two distinct entities blend as one.
To realise the goal of ones existence by actually
shedding ones entity
‘Dvait-Advait’- where all masks come off
leaving only the bare truth
A sublime joy untouched by the material world
It’s where the desire to merge into a single
inseparable state emanates
When ‘giving’ affords greater satisfaction than ‘receiving’
And lavishing turns more fulfilling than consuming.
‘Dvait-Advait’ is the pinnacle of intense bliss
bestowed by Nature.
It is the pure ecstasy of togetherness…
a state of being beyond words.